उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन आणि हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 

 
Osmanabad police

शिराढोण  : हिंगणगाव, ता. कळंब येथील महादेव पांडुरंग तनपुरे यांच्या घराच्या गेटचे कुलूप दि. 02- 03.02.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने तोडून घरातील 12 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 35,000 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या महादेव तनपुरे यांनी दि. 04 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंवला आहे.

 
कळंब -  बुलडाणा नागरी सहकारी पत संस्थेचे कळंब एमआयडीसीत ‘माऊली कृपा वेअर हाउस’ हे भाडोत्री गुदाम असून त्या गुदामाचे कुलूप दि. 25- 29.01.2022 रोजी दरम्यान अज्ञात व्यक्तीने तोडून गुदामातील 3.65 मेट्रीक टन सोयादाने चोरुन नेले. अशा मजकुराच्या व्यवस्थापक- संतोष गोराडे यांनी दि. 04.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 

वाशी -  सरमकुंडी, ता. वाशी येथील असलम माणिक तांबोळी यांनी घरासमोरील भागवत देवराव काळे हे अवैध मद्य विक्री करत असल्याने असलम यांनी दि. 01.02.2022 रोजी 17.00 वा. सु. त्यांना मद्य विक्रीस मनाई केली. यावर भागवत काळे यांसह संजय काळे, दयानंद काळे, विजयाबाई काळे, समाधान काळे, राजेंद्र काळे अन्य 20 व्यक्तींनी असलम यांसह त्यांची पत्नी व मुलगा यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच गुप्ती, लोखंडी गज, हातोडी, दगड, पारेने मारहान करुन गंभीर जखमी केले व तांबोळी यांच्या पत्नी- जरीना यांच्या गळ्यातील दागिने, असलम यांच्या खिशातील 29,000 ₹ तर घरातल्या कपाटातील 1 लाख रुपये घेउन गेले. अशा मजकुराच्या असलम तांबोळी यांनी दि. 04 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम 452, 327,504, 506, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
कळंब - : गांधीनगर, कळंब येथील अनंत माळवदे, वय 78 वर्षे यांसह त्यांच्या पत्नी- विजया यांस धाकटा मुलगा- शरद हा दि. 03.02.2022 रोजी 15.00 वा. सु. घरात शिवीगाळ करत होता. यावेळी शरद याचा मोठा भाऊ- महेश याने शरद यास विरोध केला असता शरदने दगड हाताने उगारुन महेश यास धमकावून वडील- अनंत यांना ढकलून जमीनीवर पाडले. त्यामुळे अनंत यांच्या मांडीचे हाड मोडून ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या अनंत यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 336, 338, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                               

From around the web