उस्मानाबाद जिल्ह्यात फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल 

 
crime

उमरगा : उमरगा तालुक्यातील जकेकुर गावातील डाकघराचे पोस्टमास्तर- दादाराव राम कोळी, निलावतील सहदेव बिराजदार (आर.डी.एजंट), डाक आवेक्षक- श्री.बी.एस. सोनवणे व उप डाकपाल, दाळींब यांनी दि. 03.12.2020 ते 06.01.2022 या कालावधीत संगणमताने जकेकुर गावातील आरडी खातेदारांकडुन व आरडी एजंटकडून वेळोवेळी आरडीचे पैसे स्वीकारुन पासबुकामध्ये रकमेच्या नोंदी करुन, सही- शिक्के दिले. यानंतर कार्यालयीन आरडीच्या याद्यांमध्ये छेडछाड केली. तसचे आरडी खातेदारांचे पासबुक गहाळ करुन 6,34,584 ₹ रक्कम सरकार जमा न करता तीचा अपहार केला. अशा मजकुराच्या उमरगा उप विभागाचे डाक निरीक्षक- सचिन मलिकार्जुन स्वामी यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 409, 465, 468, 471, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : लातूर येथील निशीकांत नामदेव राउत व विष्णुदास सारडा यांच्यात आळणी गट क्र. 333 मधील 1 हेक्टर 96 आर जमीनीचा खरेदी- विक्री व्यवहार होवूनये म्हणुन आळणी ग्रामस्थ- विश्वास चंद्रकांत गायकवाड, बालाजी व अक्षय विश्वास गायकवाड या तीघांनी विष्णुदास सारडा व विश्वास गायकवाड यांच्यात इसार पावती किंवा करारनामा झाल्याचे खोटे व बनावट दस्तऐवज तयार केले. ते दस्तऐवज खरे असल्याचे भासवून लोकांची व निशीकांत राउत यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने तसेच बनावट दस्ताऐवजाच्या सहायाने ती जमीन हडपण्याच्या उद्देशाने नमूद तीघा गायकवाड पिता- पुत्रांनी सदर बातमी दि. 09- 10.02.2022 रोजी दरम्यान वृत्तपत्रात प्रसिध्द्रीस दिली. अशा मजकुराच्या निशीकांत राउत यांनी दि. 22 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 468, 471, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपहरण 

परंडा  : एक 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 22.04.2022 रोजी पहाटे 04.00 वा. सु. तीच्या अंथरुणावर कुटूंबीयांस न दिसल्याने कुटूंबीयांनी परिसरात तसेच नातेवाईकांकडे तीचा शोध घेतला. परंतू तीच्या बद्दल काही उपयुक्त माहिती न मिळाल्याने अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले असावे अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या आईने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web