उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 

 
crime

येरमाळा :  कडकनाथवाडी ग्रामस्थ शहाजी जगताप हे दिनांक 16 एप्रील रोजी 15.30 वा तेरखेडा येथील उडडान पुलाजवळ मित्र-पप्पु दिनकर उकरंडे  यासोबत  उभे होते. यावेळी तेरखेडा ग्रामस्थ अतुल घोलप याने जुन्या वादातुन शिवीगाळ करुन पप्पुच्या चेह-यावर तलवारीने वार केला  तर शहाजी यांच्या पोटात तलवार भोसकल्याने ते दोघे गंभीर जखमी झाले.अशा मजकुराच्या शहाजी यांनी वैद्यकिय उपचारा दरम्यान दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादसं कलम 307 अंतर्गत गुन्हा  दिनांक 18 एप्रील रोजी नोंदवला आहे.

मुरुम  : खैराट ता.अक्कलकोट येथील मैमुना बिराजदार या दिनांक 17 एप्रील रोजी 18.00 वा वरणाळवाडी येथील गट क्रमांक 169 मधील शेतात होत्या.यावेळी भाउबंद- खाजाभाई यांसह त्यांचे कुंटुंबीय जन्न्तबी, साहेबलाल , सिंकदर , समीना यांनी शेतमालकीच्या वादातुन मैमुना यांना शिवीगाळ करुन लाथा बुकयांनी व काठीने मारहाण करुन पुन्हा शेतात आल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मैमुनबी यांनी  दि. 18 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 143, 149, 324, 506,34 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

चोरीचे दोन गुन्हे दाखल 

 कळंब  :  गोंविद गंगणे रा.गौरगाव यांनी त्यांची पॅशन प्रो मोटार सायकल क्रमांक एम एच 25 ए बी 9508 ही 28 मार्च रोजी सकाळी कळंब येथील बाजार मैदाना जवळ लावली असता अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या गंगणे यांनी दिनांक 18 एप्रील रोजी  दिलेल्या प्रथम खबरे वरुन  भा.द.स कलम 379 अंतर्गत  गुन्हा नोंदवला आहे.

 
येरमाळा  : अशोक जगदाळे रा.बार्शी हे दिनांक 17 एप्रील रोजी 10.45 वा येडेश्वरी जत्रेत असतांना त्यांच्या गळयातील 57 ग्रॅम  वजणाची सुवर्ण साखळी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या जगदाळे  यांनी  दिलेल्या प्रथम खबरे वरुन  भा.द.स कलम 379 अंतर्गत  गुन्हा नोंदवला

From around the web