उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 

 
crime

उस्मानाबाद  : उतमी कायापुर ग्रामस्थ सुरेखा बेंदरे या  घरी असतांना गावकरी अच्युत बेंदरे व बालाजी बेंदरे यांनी फिर्यादीचे अंगणात येवुन आम्ही तुमचे जागेत बांधकाम करणार आहोत असे म्हणुन शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली तर अच्युत याने  हातात दगड घेउन सुरेखा यांच्या डोक्यात मारुन जखमी केले .सुरेखा यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम,324,504, 605,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भूम  : दिंडोरी येथील ग्रामस्थ संतोष विष्ण्ु डबंरे हे मिरची विक्री करीता आठवडी बाजार येथे असतांना बबन, बालाजी , महेश गुळमे यांनी उधारीचे पैसे परत देण्याच्या कारणा वरुन संतोष यास छातीला धरुन गालात चापटा मारुन व छातीवर दगड मारुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली अशा मजकुराच्या संतोष  यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम,324,504, 605,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


चोरीचे दोन गुन्हे 

परंडा  : आसु येथील शेतकरी आश्रीनाथ गणमे, संतराम आलाट, भाग्यवान रगडे या तिघांच्या शेतातील उपसा सिंचनाचे तिन एच पी क्षमतेचा एक तर पाच एच पी क्षमतेचे दोन विद्युत असे एकुण तिन विद्युत पंप दिनांक 16 -17 मार्च दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या आश्रीनाथ यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 

उस्मानाबाद  : वाशी येथील  माणीक पौळ हे दिनांक 17 मार्च रोजी 16.30 वा उस्मानाबाद बसस्थानकातील बस मध्ये चढत होते. यावेळी गर्दीचा फायदा घेवुन त्यांच्या पॅन्टच्या मागील  खिशात सोलापुर येथील रफीक शेख यांनी  हात घालुन 12,000 रुपये रक्कम चोरताच माणीक यांनी त्याचा हात पकडला. यावर  रफीक यांनी ती रक्कम तात्काळ सोबतच्या दुस-या पुरुषाकडे सोपवताच त्या पुरुषाने तेथुन पलायन केले.अशा मजकुराच्या माणीक यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 


 फसवणूक 

तुळजापुर - तुळजापुर येथील राजकुमार किसनराव रोचकरी यांनी केबल नेटवर्कींग संदर्भातील साहित्य  खरेदीसाठी दिल्ली येथील नरेश पन्वार रा.159 प्रगती नगर, साकेत मेरट दिल्ल्ी  यांना फिर्यादी यांचे पत्नी चे खातेद्वारे 60,000/- रुपये अगाउ दिलेले होते.  परंतु नरेश पन्वार यांनी ठरल्याप्रमाणे साहित्य न पुरवता घेतलेले पैसेही परत न करता रोचकरी यांची फसवणुक केली. अशा मजकुराच्या 17 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन  भा.द.सं कलम 420 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web