उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 

 
crime

नळदुर्ग  : बोळेगाव येथील सुभाष येशवंत रुपनर व लिंबाजी दगडु मदने या दोन्ही कुटुंबीयांचा गटारीच्या पान्यावरुन दिनांक- 08 मार्च रोजी 17-00 वाजता गल्लीत वाद झाला. यावेळी दोन्ही कुटुंबीयांनी परस्पर विरोधी कुटुंबीयास शिवीगाळ करुन काठीने,लाथा –बुक्याने मारहान करुन जखमी केले.अशा मजकुराच्या दोन्ही गटांनी दिलेल्या परस्पर विरोधी प्रथम खबरेवरुन भा.द.सं 324, 504, 506, 34 अंतर्गत दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. 

तुळजापुर  : काक्रंबा येथील रंजना साठे यांना भावुबंद गोपाळ साठे यांनी दिनांक-09 मार्च रोजी 14-30 वाजता शेतातील नळया तोडण्याच्या वादातुन शिवीगाळ करुन काठीने मारहान केली. यात रंजना यांच्या डाव्या मनगटाचे हाड मोडले आहे. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं 325,504, अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आले आहेत. 

चोरी

येरमाळा  : येरमाळा येथील अमितकुमार कोठावळे यांच्या बंद घराचा कडी कोयंडा दिनांक- 09 मार्चच्या पहाटे अज्ञात व्यक्तीने तोडुन  घरातील कपाटातील 70 ग्रॅम सुवर्ण दागिने, 12,000 रुपये रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या अमितकुमार कोठावळे यांनी  दि. 09.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे

From around the web