उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 

 

उस्मानाबाद  : वाघोली, ता. उस्मानाबाद येथील तेजस दिलीप चव्हाण यांनी कौटुंबीक कारणावरुन दि. 20.02.2022 रोजी 05.30 वा. सु. राहत्या घरात पत्नी- विद्या यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याच्या उद्दशाने विद्या यांच्या मानेवर डाव्या बाजूस व डाव्या हातावर चाकुने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या विद्या यांचे चुलते- राजेंद्र श्रीमंत शिंदे, रा. बेलवाडी, ता. लोहारा यांनी दि. 21.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : काळे प्लॉट, उमरगा येथील विशाल लक्ष्मण सुर्यवंशी हे दि. 21.02.2022 रोजी गल्लीतीलच कुमार दिगंबर अबाचने यांच्या घरासमोरुन जात होते. यावेळी कुमार अबाचने यांनी जुन्या वादावरुन विशाल यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. यावर विशाल यांनी कुमार यांना त्याचा जाब विचारला असता कुमार यांसह अभिषेक बनसोडे, शंकर पाटील, स्वप्नील माळी या सर्वांनी विशाल यांना विशाल यांना लाथाबुक्क्यांनी, हंटरने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या विशाल सुर्यवंशी यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


चोरीचे दोन गुन्हे दाखल 

उस्मानाबाद  : सांजा चौक, उस्मानाबाद येथील प्रतिक हॉटेलमागील जिवो कंपनीच्या साहित्य पुरवठा दुकानाचा दरवाजा दि. 17- 18.02.2022 दरम्यानच्या रात्री उघडा असल्याची संधी साधून दुकानातील कोसारेट 75 ए.एच. 48 बॅटरी व 1 रॉवटर असे साहित्य चोरुन नेले. अशा मजकुराच्या दुकान चालक- अण्णासाहेब नागनाथ कोळेकर, रा. नरोवोटेवाडी, ता. सोलापूर (उ.) यांनी दि. 21.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : कल्पनानगर, कळंब येथील वैभव दत्तात्रय सुरवसे यांच्या घराचा कडी- कोयंडा दि. 18- 19.02.2022 रोजी दरम्यानच्या रात्री कल्पनानगर, पारधी पिढी येथील एका संशयीताने तोडून घरातील 24 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व चांदीच्या सस्तू असा 85,400 ₹ किंमतीचे दागिने चोरुन नेले. अशा मजकुराच्या वैभव सुरवसे यांनी दि. 21.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                               

From around the web