उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 

 
Osmanabad police

शिराढोण : रांजणी, ता. कळंब येथील पद्माकर अच्युत शिंदे, कृष्णा भालेकर, माउली भालेकर, दत्तु भालेकर, उत्रेश्वर माने, बालासाहेब माने, विठ्ठल माने, राधाकिसन गडदे या सर्वांनी दि. 18.02.2022 रोजी 20.00 वा. सु. चिचखंडी, ता. अंबाजोगाई येथील ऊसतोड कामगा- अशोक बाबुराव धायगुडे यांना रांजणी येथे बालावून घेउन जुन्या भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, लोखंडी नळी, काठी, दगडाने मारहान करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या अशोक धायगुडे यांनी दि. 20.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : धनगरवाडी, ता. तुळजापूर येथील रमेश शामराव राठोड यांसह त्यांच्या कुटूंबातील 11 व्यक्तींच्या गावतीलच ओंकार शंकर निसरगुंडे यांसह त्यांच्या कुटूंबातील 10 व्यक्तींशी जुन्या भांडणावरुन दि. 19.02.2022 रोजी 18.30 ते 19.00 वा. दरम्यान धनगरवाडी शिवारात हानामाऱ्या झाल्या. यात दोन्ही गटांतील स्त्री- पुरुषांनी परस्परविरोधी गटातील स्त्री- पुरुषांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, म्हशीच्या लोळण्याने, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रमेश राठोड व ओंकार निसरगुंडे यांनी दि. 20.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

                                                                                               

From around the web