मटका जुगाराचे दोघे सुत्रधार उस्मानाबाद जिल्ह्यातून हद्दपार

 
crime

उस्मानाबाद  -  माकणी, ता. लोहारा येथील- 1) दिलीप विश्वंभर साठे उर्फ उमराव, वय 54 वर्षे 2)सतीश लक्ष्मण रजपुत, वय 43 वर्षे हे दोघे एकत्र येउन उपद्रवि टोळी करुन साथीदारांसह माकणी, सास्तुर, पेठसांगवी, लोहारा, जेवळी, कानेगाव तसेच आजुबाजूच्या गावात कल्याण व मुंबई मटका जुगार बुक्की चालवून त्याचे संयोजनकर्ते व सुत्रधार असून तो जुगार फोफावत असल्याने जुगार व्यसनाच्या आहारी जाउन आनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. मटका व्यवसायामुळे त्यांच्या दहशतीमुळे सर्वसामान्य जनता कंटाळली असून त्यांना प्रचलीत कायद्याची भिती अगर आदर न राहिल्याने लोहारा पोलीस ठाण्याचे सपोनि-  चिंतले यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 55 अंतर्गत नमूद दोघांविरुध्द हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता.

            सदर प्रस्तावाची चौकशी उप विभागीय पोलीस अधिकारी, उमरगा . बरकते यांनी करुन अहवाल सादर केल्याने व समक्ष झालेल्या सुनावणीत  पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकरण, उस्मानाबादअतुल कुलकर्णी यांनी दिलीप साठे व सतीश रजपुत या दोघांना आज दि. 11.11.2022 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातुन 55 दिवसाकरीता हद्दपार केले आहे. या काळात त्यांना न्यायालयाच्या किंवा सक्षम प्राधिकाराच्या मान्यतेशिवाय जिल्ह्यात प्रवेश करता येणार नसून तसे केल्यास त्या आदेशाचा भंग ठरणार आहे.

From around the web