तुरोरी : निष्काळजीपणे पिस्टल हाताळल्याने छातीत गोळी लागून तरुणी जखमी  

 
Osmanabad police

उमरगा : तुरोरी, ता. उमरगा येथील ग्रामस्थ- श्रीमती पुजा सागर जाधव या दि. 15.02.2022 रोजी सायंकाळी 18.30 वा. सु. घरासमोरील अंगण झाडत असतांना त्यांना एक गावठी बनावटीचे पिस्टल सापडले. 

पुजा यांनी ते पिस्टल निष्काळजीपने हाताळल्याने पिस्टलचा चाप (ट्रिगर) दाबला जाताच पिस्टलातील गोळी पुजा यांच्या छातीत लागून त्या गंभीर जखमी झाल्या. यावरुन उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल- वाल्मीक कोळी यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन पिस्टल टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तीसह पुजा जाधव यांच्या विरुध्द शस्त्र कायदा कलम- 3, 7, 25 सह भा.दं.सं. कलम- 176 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपहरण 

उस्मानाबाद  : एका गावातील एक 15 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 16.02.2022 रोजी सकाळी कुटूंबीयांस सांगूण शाळेस जाण्यासाठी घराबाहेर पडलेली. शाळा सुटून बराच कालावधी झाला तरी ती घरी लवकर न परतल्याने कुटूंबीयांनी नातेवाईक, तीच्या मैत्रीणींकडे शोध घेतला असता गावातीलच एका तरुणाने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केल्याचे त्यांना समजले. अशा मजकुराच्या मुलीच्या पित्याने दि. 18 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363, 366 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                               

From around the web