तुळजापूर : चोरीच्या रकमेसह दोन महिला अटकेत

 
crime

तुळजापुर : मुंबई येथील आशा सोना मगर या दि. 03.05.2022 रोजी 14.30 वा. सु. तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदीरा देर्शनासाठी गेल्या असता गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पर्समधील 2,330 ₹ रक्कम चोरुन नेली. यावर श्रीमती आशा मगर यांनी पोलीसांकडे धाव घेतली असता पोलीसांनी मंदीरातील सीसीटीव्ही फुटेजचे निरीक्षण केले असता चोरी करतांना दोन महिला दिसुन आल्या. पोलीसांनी त्यांच्याकडे धाव घेउन त्यांची नावे विचारली असता त्यांनी प्रियंका करण उपाध्य व मैनाबाई किसन उपाध्य, दोघी रा. कुलबर्गी, राज्य कर्नाटक असे सांगीतले महिला पोलीसांच्या मदतीने त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ नमूद चोरीची रक्कम मिळुण आल्याने पोलीसांनी त्या दोघींना ताब्यात घेतले. यावर आशा मगर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
दोन ठिकाणी चोरी 

येरमाळा  : उस्मानाबाद येथील विशाल विनायक कांबळे यांची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एआर 6679 ही दि. 29.04.2022 रोजी 05.30 वा. सु. येडेश्वरी मंदीर परिसरातील एका हॉटेल समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या विशाल कांबळे यांनी दि. 03 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : डोमगाव, ता. परंडा येथील वर्षा सोमनाथ साबळे या दि. 28.4.2022 रोजी 15.00 वा. सु. परंडा बस स्थानक परिसरात असतांना गर्दीचा फायदा घउन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या जवळील बाजाराच्या पिशवीतील 13 ग्रॅम वजनाचे सुवर्ण मंगळसुत्र, भ्रमणध्वनी व 400 ₹ रक्कम असलेली पर्स वर्षा यांच्या नकळत चोरुन नेली. अशा मजकुराच्या वर्षा यांनी दि. 03 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web