तुळजापूर :  पिकअपने धडक दिल्याने एक ठार,एक जखमी 

 
crime

तूळजापुर : तुळजापुर खुर्दु,ता.तुळजापुर येथील- सौदागर विश्वनाथ चव्हाण वय 45 वर्ष सोबत गावकरी- अनिकेत शाम भोजणे वय 19 वर्षे हे दोघे दि.02.01.2023 रोजी 19.45 वा. सु. तुळजापुर खुर्दु मज्जीदजवळ रस्त्यावर पायी जात होते.

दरम्यान अज्ञात चालकाने पिकअप क्र एम.एच.13 सीयु. 3207 हा निष्काळजीपने चालवल्याने सौदागर यांना पाठीमागून धडक देउन गंभीर जखमी होउन मयत झाले.तसेच अनिकेत हे किरकोळ जखमी झाला. या अपघातानंतर पिकअप चालक अपघात स्थळावरुन पसार झाला.अशा मजकुराच्या मयताचे भाउ-महेश चव्हाण यांनी दि. 02.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), सह मो.वा.का. कलम- 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे

“ लैंगीक अत्याचार.”

 उस्मानाबाद  : एका गावातील एक 35 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) दि. 04.12.2022 रोजी 18.00 ते 18.30 वा.सु.गावातील एका तरुणाने तुला कामाला नेतो असे म्हणून महिलेस नेहून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास त्याने तिच्यासह तिच्या नवऱ्यास व मुलास ठार मारण्याची धमकी दिली.तसेच गावातील अन्ये तीन महिलांनी शिवीगाळ करून मारहाण केली. अशा मजकुराच्या पिडीतीने दि.02.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376,323,504,506,34 कायदा कलम अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तु.

From around the web