तुळजापूर : कौटुंबिक वादातून कोयत्याने वार करुन तरुणाचा खून 

 
crime

तुळजापूर : मसला (खुर्द), ता. तुळजापूर येथील ज्ञानेश्वर नाना करंडे, वय 29 वर्षे यांचा येवती, ता. उस्मानाबाद येथील नातेवाईक संभाजी खोचरे यांसह त्यांची मुले- रामेश्वर, संभाजी व अनीता सतीष भोसले यांच्याशी कौटुंबीक वाद आहे. या रागातून नमूद लोकांनी ज्ञानेश्वर करंडे हे दि. 09.06.2022 रोजी 17.30 वा. पुर्वी तुळजापूर- सोलापूर रस्त्यावरील काका ढाब्याजवळ मोटारसायकल चालवत जात असताना त्यांचा पाठलाग करुन ज्ञानेश्वर यांच्या पोटावर, बरगडीवर लोखंडी कोयत्याने वार करुन त्यांचा खून केला. अशा मजकुराच्या ज्ञानेश्वर यांचा भाऊ- भैरुनाथ नाना करंडे यांनी आज दि. 10 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 34, सह शस्त्र अधिनियम कलम- 4, 25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

दोन ठिकाणी हाणामारी 

उस्मानाबाद  : उंबरे कोठा, उस्मानाबाद येथील भारत चव्हाण हे दि. 09 जून रोजी 08.00 वा. सु. घरासमोरील साठलेल्या सांडपाण्यासाठी खोदून वाट करत असताना शेजारी- श्रीहरी चव्हाण व अनिता या दोघा पती- पत्नींनी त्या कारणावरुन भारत चव्हाण यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या सुमनबाई भारत चव्हाण यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : घर व शेतजमीनीच्या वादातून कुन्सावळी, ता. तुळजापूर येथील संजय शिंदे, सरदार शिंदे, अनिता शिंदे, सुगलाबाई शिंदे, नर्मदा चव्हाण या सर्वांनी दि. 08 जून रोजी 09.30 वा. सु. लोहगाव, ता. तुळजापूर येथील भाऊबंद- वैशाली संजय शिंदे यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लाकडाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या वैशाली शिंदे यांनी दि. 09 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web