तुळजापूर : सार्वजनिक मालमत्ता विद्रुपण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

 
crime

तुळजापूर : तडवळा, ता. तुळजापूर ग्रामस्थ- मस्के कुटूंबातील भारत, सिद्राम, रमेश, तानाजी, जगन्नाथ, रविंद्र, गजेंद्र, अरुण, सागर, आकाश, हरी व पांडुरंग आखाडे, मनोज गायकवाड या सर्वांनी कोणतीही शासकीय परवानगी न घेता अनाधीकृतपणे दि. 23.04.2022 रोजी 11.30 वा. सु. सोलापूर- उस्मानाबाद या मार्गावरील तडवळा गावाजवळील उड्डान पुलावर राष्ट्रीय पातळीवरील माजी नेत्याचे नाव लिहून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरन केले. यावरुन तुळजापूर पो.ठा. चे पोलीस अंमलदार- कृष्णा चौधरी यांनी दि. 15 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 153 सह सार्वजनिक मालमत्ता विद्रुपण कायदा कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            याच प्रकरणी गावकरी- वैजनाथ व नितीन बेले यांसह गुंड कुटूंबातील- प्रविण, सिंहल, विनोद, श्रीमंत यांनी दि. 14 मे रोजी पुलावरील राष्ट्रीय पातळीवरील माजी नेत्याच्या नावावर जाणीवपुर्वक रंग देउन ते नाव झाकले आहे. अशा मजकुराच्या तडवळा ग्रामस्थ- शरद मस्के यांनी दि. 15 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 अपहरण 

 एक 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 14 मे रोजी 11.00 ते 12.00 वा. दरम्यान तीच्या घरासमोर असताना गावातीलच एका तरुणाने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पित्याने दि. 15 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web