तुळजापूर : प्राण्यांची निर्दयतेने वाहतुक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

 
crime

तुळजापूर  : अजिम हसन कुरेशी, बबलु शाहीद कुरेशी, दोघे रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर हे दि. 24.04.2022 रोजी 16.00 वा. सु. होनाळा ते बारुळ रस्त्याने वाहन क्र. एम.एच. 25 पी 5225 व एम.एच. 25 पी 0968 या दोन बोलेरो पिकअपमध्ये 2 खोंड, 8 रेडे व एक बैल दाटीवाटीने भरून त्यांच्या चारापाण्याची कोणतीही व्यवस्था न करता निर्दयतेने तसेच अवैधरित्या वाहतुक करत असताना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन तुळजापूर पो.ठा. चे पोलीस अंमलदार- विलास माळी यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द प्राण्यांना क्रुरतेने वागणुकीस प्रतिबंध कायदा कलम- 11 (1) (ए) (डी) (एच) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 119 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
अवैध गुटखा बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

कळंब  : पापडे गल्ली, कळंब येथील सोमनाथ क्षीरसागर यांनी गल्लीतील त्यांच्या दुकानात 6 पुडके गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ असा एकुण 16, 820 ₹ किंमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला अन्न पदार्थ गुटखा बाळगलेले असताना कळंब पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन कळंब पो.ठा. चे किरण आंभोरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 272, 273 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web