परंड्यात चोरीच्या वाळूसह ट्रॅक्टर ताब्यात

 
Osmanabad police

परंडा : अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी परंडा पो.ठा. चे पथक दि. 13.02.2022 रोजी 18.15 वा. सु. कारंजा, ता. परंडा येथील सिना नदीपात्राजवळ आले असता त्या ठिकाणी शिंगेवाडी, ता. माढा, जि. सोलापूर येथील निखील अंजन शिंदे हे स्वराज ट्रॅक्टर- ट्रेलर क्र. एम.एच. 45 एएल 1032 मध्ये नदीपात्रातील 1 ब्रास वाळु भरुन घेउन जात असल्याचे पथकास आढळले. यावर पथकाने गौण खनिज स्वामित्व शुल्क इत्यादी विषयी शिंदे यांस विचारले असता ते समाधानकारक उत्तरे देत नसल्याने ती वाळू चोरुन नेत असल्याचा संशय बळावला. यावरुन पोलीसांनी तो ट्रॅक्टर- ट्रेलर जप्त करुन याप्रकरणी पोकॉ- अमोल वाघमारे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 सह गौध खनिज अधिनियम कलम- 48 (7) (8) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरीच्या दोन घटना 

येरमाळा  : शेलगाव, ता. कळंब येथील बिभीषण मारोती दिवाणे यांच्या घराच्या गेटचे कुलूप दि. 13.02.2022 रोजी 15.30 ते 18.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने तोडून घरातील 23 ग्रॅम सुवर्ण दागिने, चांदीच्या वस्तू व 3,000 ₹ रोख रक्कम असा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या बिभीषण दिवाणे यांनी दि. 14 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा  : तेरखेडा येथे असलेल्या इंडस कंपनीच्या भ्रमणध्वनी मनोऱ्याच्या यंत्रणेतील 50 मीटरचे 5 नग व 20 मीटरचा 1 नग असे एकुण 270 मीटर वायर दि. 12.02.2022 रोजी 02.00 ते 04.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या महादेव ढवण, रा. खंडाळा, ता. तुळजापूर यांनी दि. 14 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web