उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

बेंबळी  : कनगरा, ता. उस्मानाबाद येथील सोमनाथ रघुनाथ ढेपाळे हे आपल्या घराचा दरवाजा पुढे करुन दि. 10 जून रोजी 02.30 वा. सु. कुटूंबीयांसह अंगणात झोपले होते. यावेळी गावातील- सयाजी इंगळे यांनी ढेपाळे यांच्या अंगणातील बल्ब विझवून घरात प्रवेश करुन पिशवीतील 50,700₹ रक्कम चोरुन नेत असताना इंगळे यांच्या पायाचा धक्का ढेपाळे यांस लागला. यावर ढेपाळे यांनी इंगळे यांस पकडले असता त्यांनी ढेपाळे यांच्या हातास झटका देउन तेथून पळ काढला. अशा मजकुराच्या सोमनाथ ढेपाळे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : गवळी वाडा, उस्मानाबाद येथील दिनकर मधुकर निकम यांच्या बार्शी रस्त्यालगत असलेल्या ‘निकम किराणा’ दुकानाच्या शेडचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 09- 10 जून रोजी दरम्यानच्या रात्री तोडून दुकानातील तेल, साबण, पावडर, पेस्ट, शाम्पू असे इत्यादी किराणा साहित्यासह गल्ल्यातील 7,500 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या दिनकर निकम यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  : लिंबोनी, ता. मंगळवेढा, जि. सोलापुर येथील अर्जुन शिवाजी शिंदे यांची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 13 डीयू 5132 ही दि. 09- 10 जून रोजी दरम्यानच्या रात्री वाशी येथील बाबा पेट्रोल पंप जवळून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या अर्जुन शिंदे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

रस्ता अपघात

तुळजापूर : चालक- रतनभाई जलवा, रा. मकानपुर, ता. देवभुमी, राज्य- गुजरात यांनी दि. 09 जून रोजी 10.45 वा. सु. तुळजापूर येथील राष्ट्रीय महामार्गावर ट्रक क्र. जी.जे. 37 टी 7694 हा निष्काळजीपने चालवल्याने कार क्र. एम.एच. 13 बीएन 2368 ला समोरुन धडकला. या अपघातात कारमधील नितीन मुरलीधर शिंदे, स्मिता शिंदे, यश शिंदे, तीघे रा. सोलापूर हे किरकोळ व गंभीर जखमी होउन कारचे आर्थिक नुकसान झाले. अशा मजकुराच्या अपूर्व मनोहर जाधव, रा. सोलापूर यांनी दि. 10 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web