उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

वाशी : पारा शिवारातील नांदुर रस्त्यावरील मांजरा नदीच्या बंधाऱ्याच्या दरवाजाच्या 19 लोखंडी पाट्या दि. 03 जून रोजी 01.00 वा. सु. पांगरबावडी, ता. बीड येथील मोहन शिरवाटे व बाबु गायकवाड या दोघांनी चोरुन नेल्या. यावरुन शाखा अभियंता, लघु पाटबंधारे विभाग- रावसाहेब पिंपळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथमख खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम : येणेगुर शिवारातील गट क्र. 367 मधील पेट्रोलियम किरकोळ विक्री केंद्राच्या भुमीगत डिझेल टाकीतील 8,977 लि. डिझेल दि. 23- 24.05.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने उपसून चोरुन नेले आहे. अशा मजकुराच्या विजय उत्तमराव शिंदे, रा. औसा यांनी दि. 03 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण  : प्रकाश नारायणदास मुंदडा, रा. शिराढोन यांच्या शेतातीलच 4 सालगड्यांनी त्यांच्या रखवालीतील 2 पोती गहू, मोटारीचा स्टार्टर व एक भ्रमणध्वनी असा माल दि. 27- 28.05.2022 रोजी दरम्यानच्या रात्री चोरुन नेला. अशा मजकुराच्या प्रकाश मुंदडा यांनी दि. 03 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 381, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web