उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील काटी शिवारात एटीसी कंपनीच्या मनोऱ्याच्या अमार राजा कंपनीच्या 24 बॅटरी दि. 20 मे रोजी 02.00 ते 15.30 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या एटीसी कंपनीचे कर्मचारी- ज्ञानेश्वर ईटकर, रा. वडाळा, ता. सोलापूर (उ) यांनी दि. 02 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी : चिखली, ता. उस्मानाबाद येथील संभाजी शिवाजी सुरवसे यांच्या घराच्या पाठीमागील खिडकी अज्ञात व्यक्तीने दि. 01- 02 जून रोजी दरम्यानच्या रात्री उघडून आतील 15 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 1,80,000 ₹ रक्कम असा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या संभाजी सुरवसे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
परंडा : संगम पार्क, परंडा येथील मुजिब मुर्तुजा पठाण यांची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल एम.एच. 25 एक्यु 8498 ही दि. 30- 31 मे रोजी दरम्यानच्या रात्री त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या पठाण यांनी दि. 02 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.