उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

उस्मानाबाद  : अपसिंगा, ता. तुळजापूर येथील शंभो दत्तात्रय पांचाळ यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 झेड 0224 ही दि. 31 मे रोजी 10.15 ते 18.00 वा. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद आवारातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या शंभो पांचाळ यांनी दि. 01 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : देवळाली, ता. उस्मानाबाद ग्रामस्थ- निरंजन पांडूरंग सपकाळ यांच्या गट क्र. 109 मधील शेत विहीरीतील 5 अश्वशक्ती क्षमतेचा पानबुडी विद्युत पंप व 115 मिटर वाय दि. 31.05.2022 ते 01.06.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या निरंजन सपकाळ यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : पुणे येथील संगीता दिपक म्हमाणे, वय 46 वर्षे या दि. 31 मे रोजी 16.45 वा. सु. नवीन बस स्थानक, तुळजापूर येथील फलाटावरील बसवकल्याण- कासारशिरशी जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पर्समधील सुवर्ण दागिने व भ्रमणध्वनी असा एकुण 50,000 ₹ चा माल म्हमाणे यांच्या नकळत चोरुन नेला. अशा मजकुराच्या संगीता म्हमाणे यांनी दि. 01 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web