उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

तुळजापूर  : उरण, ता. रायगड येथील उज्वला दत्ता वाघमारे या दि. 24 मे रोजी 12.30 वा. सु. तुळजाभवानी मंदीरासमोर असताना गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने वाघमारे यांच्या नकळत त्यांच्या पर्समधील 41 ग्रॅम सुवर्ण दागीने  चोरुन नेले. अशा मजकुराच्या श्रीमती उज्वला वाघमारे यांनी दि. 25 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : चिवरी गवातील इंडस मनोऱ्याच्या अमार राजा कंपनीच्या 24 बॅटरी सेल दि. 14 मे रोजी 00.30 ते 06.00 वा. दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या महादेव पंडीत ढवण, रा. खंडाळा, ता. तुळजापूर यांनी दि. 25 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोन  : मंगरुळ, ता. कळंब येथील रमाकांत बाबासाहेब रितापुरे यांच्या शेतातील 10 पोते सोयादाने, 5 पोते हरभरा व 5 पोते गहु असा एकुण 66,000 ₹ चा माल त्यांच्या दोन सालगड्यांनी दि. 24- 25 मे रोजी दरम्यानच्या रात्री चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या रमाकांत रितापुरे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 381 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web