उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

उस्मानाबाद : बार्शी येथील द्रोपदी जाधव या दि. 21 मे रोजी 13.30 वा. सु. उस्मानाबाद बस स्थानकामधील बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेउन त्यांच्या गळ्यातील प्रत्येकी 10 ग्रॅम वजनाचे दोन सुवर्ण हार अज्ञात व्यक्तीने गुपचुपपणे चोरुन नेले. अशा मजकुराच्या जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

आंबी  : शेळगाव येथील अभिमान शेवाळे यांच्या कुलुप बंद घराचा दरवाजासह घरातील कपाटाचे कुलुप गावकरी- अमोल जगताप याने दि.21 मे रोजी रात्री 21.00 ते 23.30  वा. दरम्याण तोडुन 1,000 रुपये रकमेसह 2,500 रुपयेचे चांदिचे दागिणे चोरुन नेत असल्याचे शेवाळे यांना आढळले. अशा मजकुराच्या शेवाळे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : सोलापुर येथील ट्रक चालक- अफजल मकानदार हे दि.22 मे रोजी रात्री 03.00 ते 06.00 वा दरम्याण बावी फाटा येथील चिंतामणी हॉटेल समोरील महामार्गावर ट्रक लावुन आत झोपले होते. दरम्याण ट्रकच्या हौदयातील प्रत्येकी 50 कि.ग्रॅ. क्षमतेची 28 पोती असा एकुण 1.4 मेट्रीक टन सोया दाने अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या मकानदार यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web