उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

नळदुर्ग  : अणदुर, ता. तुळजापूर येथील दयानंद मुकडे हे दि. 13 मे रोजी 14.45 ते 15.15 वा. सु. चिवरी फाटा येथे असतांना गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या विजारीच्या खिशातील आयफोन दयानंद यांच्या नकळत चोरुन नेला. अशा मजकुराच्या दयानंद यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा  : तेरखेडा, ता. वाशी येथील निखील नारायण काळे हे दि. 13 मे रोजी 01.30 ते 06.30 वा. दरम्यान घरासमोरील अंगणात उषाशी वनप्लस मोबाईल व एसटीचा पास ठेउन झोपले असता तो अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या निखील काळे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : खोंदला, ता. कळंब येथील प्रशांत कोंडीबा लांडगे यांची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएम 5337 ही दि. 30.04.2022 रोजी 09.30 ते 19.30 वा. दरम्यान महिंद्रा फायनान्स, कळंब समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रशांत लांडगे यांनी दि. 13 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web