उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

परंडा :  परंडा सज्जाचे तलाठी- चंद्रकांत बापु कसाब यांसह त्यांच्या पथकास दि. 21.04.2022 रोजी 00.05 वा. सु. आठवडी बाजार परंडा परिसरात सतिश विश्वनाथ मेहर व त्यांचा मुलगा हे दोघे स्वराज 855 या प्रकाराच्या ट्रॅक्टर- ट्रेलर मधून 1 ब्रास वाळू (गौण खनिज) ची चोरटी वाहतूक करत असतांना आढळले. यावर पथकाने मेहर यांना वाळु वाहतुकीचा परवाना विषयी विचारणा केली असता त्याबाबत ते टाळाटाळ करु लागले. दरम्यान मेहर यांनी जवळील एका सायकल मार्ट शेजारी ट्रेलर मधील वाळू खाली ओतली. यावेळी पथक कारवाई करत असतांना मेहर पिता- पुत्र त्या ट्रॅक्टर- ट्रेलरसह घटनास्थळावरुन पसार झाले. अशा मजकुराच्या तलाठी- चंद्रकांत कसाब यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 सह महाराष्ट्र गौण खनिज कायदा कलम- 48 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : पाटील नगर, उमरगा येथील संजय महादेव पवार यांची स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 डब्ल्यु 5247 ही दि. 16.04.2022 रोजी 22.00 वा. सु. त्यांच्या राहत्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या संजय पवार यांनी दि. 21 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : तुळजापूर नाका, उस्मानाबाद येथील हेमंत शेरकर यांची हिरो होंडा प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. 25 व्ही 2636 ही दि. 20.04.2022 रोजी 11.00 ते 17.00 वा. दरम्यान उस्मानाबाद न्यायालय परिसरातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या हेमंत शेरकर यांनी दि. 21 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web