उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
Osmanabad police

भूम  : वाकवड, ता. भूम येथील ग्रामस्थ- तात्याराम सर्जेराव मासाळ हे कुटूंबीयांसह दि. 06- 07.02.2022 दरम्यानच्या रात्री आपल्या घरात झोपलेले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराचा कडी-कोयंडा अज्ञात व्यक्तीने तोडून घरातील 59 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, दोन जोड चांदीचे पैजण व 20,000 ₹ रोख रक्कम असा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या तात्याराम मासाळ यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : पोस्ट कॉलनी, उस्मानाबाद येथील ग्रामस्थ- राजश्री कन्हैय्या मदनुरकर, वय 48 वर्षे या कुटूंबीयांसह दि. 07.02.2022 रोजी 03.00 वा. सु. आपल्या घरात झोपलेल्या होत्या. यावेळी चार अनोळखी व्यक्तींनी मदनुरकर यांच्या घराची कडी तोडून घरात प्रवेश केला. यावेळी कन्हैय्या मदनुरकर यांनी त्या चौघांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कन्हैय्या यांना कोयता, काठीने मारहान करुन गंभीर जखमी केले. तसेच श्रीमती राजश्री यांसह त्यांच्या मुलींस ठार मारण्याची धमकी देउन व शस्त्राचा धाक दाखवून घरातील 26,000 ₹ किंमतीचे सुवर्ण दागिने व 4,000 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या राजश्री मदनुरकर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 394, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी  : तामलवाडी येथे असलेल्या इंडस कंपनीच्या भ्रमणध्वनी मनोऱ्याच्या यंत्रणेतील आयडीआय बीटीएस मधील डीटीआरयु 900 चे प्रत्येकी 2,000 ₹ किंमतीचे एरिक्सॉन ब्रँडचे 6 कार्ड व सीडीयुजी 9 चे 3 कार्ड असे एकुण 9 कार्ड दि. 03.02.2022 रोजी 01.00 ते 10.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या महादेव दवण, रा. खंडाळा, ता. तुळजापूर यांनी दि. 07 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web