उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे 

 
crime

तुळजापूर  : काक्रंबा, तुळजापूर येथील विशाल रामचंद्र क्षिरसागर यांच्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 27.04.2022 रोजी 09.00 ते 16.30 वा. दरम्यान तोडून घरातील 17 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, 1,500 ₹ किंमतीचे चांदीचे दागिने चोरुन नेले. अशा मजकुराच्या विशाल क्षिरसागर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : चिवरी (उमरगा) सावठवण तलावातील रामेश्वर जनार्धन काळे, रा. अणदुर यांची टेक्स्मो विद्युत पानबुडी पंप अंज्ञात व्यक्तीने दि. 25- 27.04.2022 रोजी दरम्यान चोरुन नेला. अशा मजकुराच्या रामेश्वर काळे यांनी दि. 27 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी : इसरुप शिवारातील विनवर्ल्ड कंपनीच्या पवनचक्कीचा कंट्रोल कॅबीनेट 1 नग व पॉवर कॅबीनेट 2 नग असा 60,000 ₹ चा माल अज्ञात व्यक्तीने दि. 22- 23.04.2022 रोजी दरम्यान चोरुन नेला. अशा मजकुराच्या सोमनाथ मन्मथ तोडकर, रा. खानापुर, ता. वाशी यांनी दि. 27 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी: धारुर, ता. उस्मानाबाद येथील विश्वनाथ बब्रुवान रोकडे यांच्या धारुर गट क्र. 373 मधील शेतातील 5 हजार कडबा असलेल्या गंजीला दि. 26- 27.04.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने आग लावून अंदाजे 50,000 ₹ चे आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या विश्वनाथ रोकडे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web