उस्मानाबाद जिल्ह्यात तीन अपघातात तीन ठार, तीन जखमी 

 
crime

उमरगा  : चिंचोली प्लॉट, उरमगा येथील- हैदर महेबुब मुल्ला, वय- 55 वर्षे हे दि. 17.10.2022 रोजी 07.45 वा. सु. उरमाळा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरुन मॉर्निंग वॉक करत होते. दरम्यान चालक- किरण सुनिल धनवडे, रा. बाभळगाव, ता. तुळजापूर यांनी मिनी ट्रक क्र. एम.एच. 25 एजे 2674 हा निष्काळजीपने चालवल्याने हैदर मुल्ला यांना पाठीमागून धडकल्याने हैदर यांच्या डोक्यातस गंभीर मार लागून ते मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- गौसपाशा हैदर मुल्ला यांनी दि. 19.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत शास्त्रीनगर, मुरुम, ता. उमरगा येथील- युसूफ उस्मान ढोबळे, वय 31 वर्षे व मशाक उस्मान ढोबळे, वय 40 वर्षे हे दोघे दि. 10.07.2022 रोजी 18.45 वा. सु. जकेकूर शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरुन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एटी 3457 ने प्रवास करत होते. दरम्यान नमूद मो.सा. मशाक ढोबळे यांनी भरधाव वेगात निष्काळजीपने चालवल्याने ती अनियंत्रीत होउन ती घसरली. या अपघातात मशाक हे स्वत: मयत होउन युसूफ ढोबळे हे किरकोळ जखमी झाले. अशा मजकुराच्या युसूफ ढोबळे यांनी दि. 19.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी  : करजखेडा, ता. उस्मानाबाद येथील- रामकृष्ण केरबा कळसुले हे दि. 17.10.2022 रोजी 22.00 वा. सु. करजखेडा चौरस्ता येथून मोटारसायकल क्र. एम.एच. 25 जे 3087 ही चालवत जात होते. यावेळी गावकरी- विठ्ठल गेनदेव आदटराव यांनी मो.सा. क्र. एम.एच. 25 एबी 9070 ही चुकीच्या दिशेने  निष्काळजीपने चालवल्याने रामकृष्ण कळसुले यांच्या नमूद मो.सा. ला समोरुन धडकली. या अपघातात रामकृष्ण हे मयत होउन विठ्ठल हे स्वत: गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या मयताचा नातु- सुभाष महादेव कळसुले यांनी दि. दि. 19.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web