उस्मानाबाद जिल्ह्यात तीन अपघातात तीन ठार, तीन जखमी 

 
crime

तुळजापूर  : सोलापूर येथील ऋषीकेश रामस्वामी मनलोर व महोदव जाधव हे दि. 14 मे रोजी 17.30 वा. सु. तुळजापूर येथील काक्रंबा पर्यायी रस्त्याने एका मोटारसायकलने प्रवास करत होते. यावेळी अज्ञात चालकाने कार क्र. एम.एच. 14 सीएक्स 5485 ही निष्काळजीपने चालवल्याने ऋषीकेश चालवत असलेल्या मो.ला. पाठीमागुन धडकल्याने ऋषीकेश यांसह महादेव हे गंभीर व किरकोळ जखमी झाले. या अपघातानंतर नमूद कारचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या ऋषीकेश मनलोर यांनी दि. 16 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत तुळजापूर येथील, कृष्णा दिलीप जितकर, वय 27 वर्षे व हनुमंत भगवान बंडगर, वय 45 वर्षे हे दोघे दि. 16 मे रोजी 03.30 वा. राष्ट्रीय महामार्गावरील समाधान हॉटेलसमोरुन तुळजापूरकडे बुलेट मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एयु 8989  ने जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या बोलेरो वाहन क्र. एम.एच. 06 एएस 4101 च्या धडकेने त्या दोघांचा मृत्यु झाला. अपघातानंतर बोलेरो वाहनासह अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या भुजंग मुकेरकर, तुळजापूर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

उस्मानाबाद  : देविदास पवार, वय 60 वर्षे, व अकबर शेख, दोघे रा. लातूर हे दि. 13 मे रोजी 16.30 वा. उस्मानाबाद शहराजवळील एका हॉटेलसमोरील महामार्गाने पायी जात होते. यावेळी मंजीनाथ भहीरगोंड, रा. विजापूर यांनी क्रुझर वाहन क्र. एम.एच. 13 सीएस 5064 ही निष्काळजीपने चालवल्याने पवार व शेख यांना पाठीमागून धडकली. या अपघातात पवार हे मयत होउन शेख हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या मयताचे भाऊ- पोपट पवार यांनी दि. 16 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा : वागेगव्हाण, ता. परंडा ग्रामस्थ- बाळु उत्तम चव्हाण यांनी त्यांचा बांध पेटवल्याने शेजारील भाऊबंद-बाळु आण्णा चव्हाण, वय 75 वर्षे यांच्या गट क्र. 13/1 मधील 2 एकर शेतातील 10-12 कांड्यावर असलेले ऊस पीक त्यासोबत जळाले. त्याचा जाब बाळु आण्णा चव्हाण यांनी बाळु उत्तम चव्हाण यांस विचारला असता त्यांनी बाळु यांना धमकावले. अशा मजकुराच्या बाळु आण्णा चव्हाण यांनी दि. 16 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web