उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात तीन ठार 

 
crime

उमरगा  : कसगी, ता. उमरगा येथील प्रशांत सुरेश पाटील, वय 25 वर्षे हे दि. 05.05.2022 रोजी 20.30 वा. सु. गावकरी- अरविंद जाधव यांच्या शेतात ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एएल 2667 ने शेताची मशागत करत होते. मशागतीदरम्यान त्यांना झोप लागल्याने ते ट्रॅक्टर उभा करुन ट्रॅक्टरजवळ झोपले. यावेळी त्यांच्या सोबत असलेले गावकरी- श्रीमंत खुने यांनी प्रशांत यांच्या परस्पर ट्रॅक्टर चालूकरुन उर्वरीत मशागत करत असतांना ट्रॅक्टर निष्काळजीपने चालवल्याने ट्रॅक्टरमागील अवजाराचा फाळ प्रशांत यांच्या डोक्यास लागून ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या सुरेश चंद्रशा पाटील, रा. कसगी यांनी दि. 06 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम  : आलीयाबाद तांडा, ता. तुळजापूर येथील राजेंद्र मोतीराम राठोड, वय 45 वर्षे व सुरेश श्विाजी चव्हाण, वय 32 वर्षे हे दोघे दि. 07.03.2022 रोजी 21.15 वा. सु. मुरुम मोड रस्त्यावरील लक्ष्मी मंदीराजवळून मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एक्यु 1530 ने प्रवास करत होते. यावेळी अज्ञात वाहनाने त्यांच्या मो.सा. ला पाठीमागून दिलेल्या धडकेत ते दोघे गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर अज्ञात वाहनाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या विमल राजेंद्र राठोड, रा. आलीयाबाद तांडा यांनी दि. 06 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   

From around the web