उस्मानाबाद जिल्ह्यात तीन अपघातात तीन ठार 

 
crime

उस्मानाबाद : आनंदवाडी, ता. बीड येथील गणेश रामचंद्र देवकते, वय 30 वर्षे हे दि. 09 मे रोजी 23.20 वा. सु. वडगाव (सि.) येथील महामार्गाने मोटारसायकल क्र. एम.एच. 25- 5811 ही चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने ट्रक निष्काळजीपने चालवल्याने देवकते यांच्या मोटारसायकलला पाठीमागून धडकल्याने गणेश हे गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर अज्ञात ट्रकचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या काकासाहेब रामचंद्र देवकते यांनी दि. 12 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : बबन बंडु गायकवाड, रा. माडज, ता. उमरगा यांनी दि. 08 मे रोजी 20.30 वा. सु. माडज शिवारातील रस्त्यावर पिकअप वाहन क्र. एम.एच. 04 जेके 6880 हा निष्काळजीपने चालवल्याने समोरील सायकलस्वार ग्रामस्थ- बलभिम प्रकाश शिंदे, वय 18 वर्षे यांना पाठीमागून धडकला. या अपघातात पिकअपचे चाक बलभिम यांच्या पोटावरुन जाउन ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- गणेश आनंदराव शिंदे यांनी दि. 12 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत माडज, ता. उमरगा येथील मोहन पांडुरंग सुर्यवंशी, वय 55 वर्षे हे दि. 11 मे रोजी 19.30 वा. सु. बाभळसुर गावातील रस्त्याने टिपर क्र. के.ए. 32 बी 3991 हा चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने ऊस भरलेला अज्ञात ट्रॅक्टर निष्काळजीपने चालवल्याने टिपरला समोरुन धडकल्याने मोहन सुर्यवंशी हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- जीवन पांडुरंग सुर्यवंशी, रा. माडज यांनी दि. 12 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web