नळदुर्गचे सपोनि सुधीर मोटे यांच्यावर तिघांचा प्राणघातक हल्ला 

 
crime

नळदुर्ग:- सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर मोटे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. नळदुर्गच्या इतिहासातअशा प्रकारची निंदनीय घटना पहिल्यांदाच घडली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात तीन सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

. याबाबत सपोनि सुधीर मोटे यांनी दिलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे की २२ मार्च रोजी बंदोबस्त करीत असताना दुपारी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास भवानी चौकात मोटार सायकल वाहनावर मोटार वाहन कायद्यानुसार केसेस करीत असताना नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड हा मोटार सायकल क्र. एम. एच.१३ सी. वाय.२८५३ वर आला तेंव्हा त्याच्या वाहनावर कारवाई करण्यात आली. 

त्यानंतर तो तिथुन निघुन गेला त्यानंतर सायंकाळी ७ वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे व पोलीस कर्मचारी रुपेश पाटील हे पेट्रोलिंग करीत बसस्थानकाकडे जात असताना मदन मोबाईल शॉपीसमोरील रोडवर पप्पु पाटील यांच्या सोबत बोलत थाबले असताना त्याठिकाणी सुशिल संजय राठोड, संदीप संजय राठोड व रोहीत संजय राठोड हे तिघे माझ्याजवळ आले यावेळी संदीप राठोड याने तु माझ्यावर कारवाई का केली असे म्हणुन वाद घालण्यास सुरुवात केली. त्याचवेळी सुशिल हा शिवीगाळ करून आणि तुला जिवंत ठेवणार नाही असे बोलुन हातात दगड घेऊन माझ्या अंगावर मारण्यासाठी आला. त्यावेळी पप्पु पाटील व इतरांनी सुशिल याला बाजुला केले. 

त्याचवेळी रोहीत याने हाताने माझ्या डोक्यात मारले. माझ्या डोक्यात मार लागल्याने मी खाली बसलो असता सुशिल राठोड हा हातात तलवार घेऊन आणि तुला कापतोच असे बोलुन जीवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर धाऊन आला. त्यावेळी पोलीस कर्मचारी रुपेश पाटील यांनी त्यास पकडले. त्यावेळी सुशिल याने पाटील यांच्या पोटात जोरदार हाताच्या कोपऱ्याने मारून तिथुन गेला. यानंतर पोलिस उपनिरीक्षक बजरंग सरपाळे, अच्युत पोतदार, शिवाजी राठोड व होमगार्ड संदीप राठोड, विनोद राठोड तेथे आले व त्यांनी मला व रुपेश पाटील यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.

सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर भाऊसाहेब मोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुशिल संजय राठोड, संदीप संजय राठोड व रोहीत संजय राठोड यांच्याविरुद्ध कलम ३०७,३५३,३३२,५०४ व ३४ भादविसह कलम ४,२५ आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे हे करीत आहेत. नळदुर्ग शहरात पोलिस अधिकाऱ्याना शिवीगाळ करून मारहाण झाल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे..

नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सुधीर मोटे  यांनी रंग पंचमीच्या दिवशी नळदुर्ग येथील संदिप राठोड यांच्या वाहनावर मोटार वाहन कायदा अंतर्गत कारवाई केली होती याचा राग त्याच्या मनात होता. दि. 22 मार्च रोजी 19.00 वाजता नळदुर्ग येथील एका रस्त्यावर सहा. पोलीस निरीक्षक सुधीर मोटे हे उभे होते. यावेळी गावकरी- संदिप राठोड यांसह त्याचे भाउु- सुशिल व विजय या तिघांनी तेथे येउन वाहनावर कारवाई  केल्याचा वाद उकरुन काढला. यावेळी संदिप व रोहीत यांनी ठार मारण्याच्या उददेशाने सपोनि- मोटे यांना  दगड फेकुन मारल्याने ते दगड मोटे यांच्या डोक्यात व पाठीत लागुन ते जखमी झाले. तसेच सुशिल याने मोटे यांच्या अंगावर तलवार उगारुन त्यांना कापुन टाकण्याची धमकी दिली असता मोटे यांनी त्यास पकडले. यावर सुशिल यांनी मोटे यांच्या पेाटात कोपराने जोराचा धक्का देउन पलायन केले. अशा प्रकारे नमुद तिघांनी पेालीसांच्या कर्तव्यात जाणिवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन सपोनि- सुधिर मोटे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 307,353,332,504, 506,34 तसेच शस्त्र कायदा कलम 4,25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web