उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात तीन ठार, चार जखमी
उस्मानाबाद : कोल्हेवाडी, ता. केज, जि. बीड येथील- सुनिल ज्ञानोबा मिसाळ यांसह त्यांची पत्नी- सत्वशिला, मुलगा- ज्योतिराम, मुलगी- शामल घेलु हे सर्व दि. 16.11.2022 रोजी 05.30 वा. सु. येडशी येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरुन ट्रॅक्टर- ट्रॉली क्र. एम.एच. 23 बी 5099 ने प्रवास करत होते. यावेळी अज्ञात चालकाने आयशर वाहन क्र. एम.एच. 20 ईएल 7610 हा निष्काळजीपने चालवल्याने नमूद ट्रॅक्टर- ट्रॉलीस पाठीमागून धडकला.
या अपघातात ट्रॅक्टर चालक- ज्योतिराम मिसाळ यांसह अपघात स्थळी रस्त्याकडेला असलेले येडशी ग्रामस्थ- एकनाथ गोयकर हे मयत होउन सुनिल मिसाळ यांसह त्यांची पत्नी व मुलगी हे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर नमूद वाहनाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या सुनिल मिसाळ यांनी दि. 16.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी : दातेवाडी, ता. खटाव, जि. सातारा येथील- नवनाथ बबन जाधव व त्यांचा पुतण्या- विजय राजू जाधव, वय 18 वर्षे, रा. तांबवे, ता.माळशिरस, जि. सालापूर असे दोघे दि. 16.11.2022 रोजी 03.00 वा. सु केशेगाव कारखाना येथील रस्त्याने पायी जात होते. यावेळी चालक- गोरख बन्सी खंदारे, रा. कारेगव्हाण, ता. बीड यांनी ट्रॅक्टर क्र. एम.एच. 23 बी 9560 हा निष्काळजीपने चालवल्याने विजय जाधव यांना पाठीमागून धडकल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद ट्रॅक्टर चालक वाहनासह अपघात स्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या नवनाथ जाधव यांनी दि. 16.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
वाशी : डोंगरवाडी, ता. वाशी येथील- अकबर अल्लाबक्ष पठाण, वय 47 वर्षे यांनी दि. 13.11.2022 रोजी सकाळी 11.30 वा. सु. आपल्या राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. गावकरी- अशोक रामदास भराटे, बालाजी अभिमान कुंरुंद, दत्तोबा पांडुरंग कुरुंद, प्रकाश वसंत भराटे यांसह बालाजी कोहिले, जितीन शेट, दोघे रा. लातुर व भगवान तांबडे, रा. बीड यांनी अकबर पठाण यांच्याकडे घेतलेल्या पैशाचा तगादा लावल्याने अकबर यांनी त्यांच्या त्रासास कंटाळून आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- महेमुद अल्लाबक्ष पठाण, रा. डोंगरवाडी यांनी दि. 16.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.