उस्मानाबाद जिल्ह्यात चार अपघातात तीन ठार, पाच जखमी 

 
crime

तुळजापूर  : सुपतगाव, ता. उमरगा येथील प्रदिप महादेव घोडके, वय 45 वर्षे यांच्या सोबत भगवंत रोहिदास कांबळे, वय 45 वर्षे हे दि. 20.04.2022 रोजी 18.30 वा. सु. काक्रंबा गावातील रस्त्याने बुलेट मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एपी 4741 ने प्रवास करत होते. यावेळी अज्ञात चालकाने ट्रक क्र एम.एच. 24 एफ 6331 हा निष्काळजीपने चालवल्याने प्रदिप यांच्या नमूद बुलेटला समोरुन धडकला. या अपघातात प्रदिप घोडके हे जागीच मयत झाले तर भगवंत कांबळे हे सरकारी दवाखाना, उस्मानाबाद येथे उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या दादासाहेब बब्रुवान घोडके, रा. सुपतगाव यांनी दि. 25 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : अज्ञात चालकाने ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एएल 630 च्या ट्रेलरला पाठीमागील बाजून ब्रेक लाईट, रिफ्लेक्टर न लावता तसेच कोणत्याही प्रकारच्या सुरक्षीततेची काळजी न घेता दि. 24.04.2022 रोजी 06.15 वा. सु. उमरगा येथील लातुर- गुलबर्गा रस्त्यावर उभा केला होता. मोटारसायकल क्र. आर.जे. 06 जेएस 7529 चे चालक- राधेशाम शर्मा यांना अंधारात तो ट्रेलर न दिसल्याने शर्मा यांची मो.सा. ट्रेलरला पाठीमागून धडकली. या अपघातात शर्मा हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या विनोद रामस्वरुप जाट, रा. गुंजोटी, ता. उमरगा यांनी दि. 25 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 338 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी  : सोलापूर येथील विजय बाबु साळुंके, वय 53 वर्षे यांसोबत त्यांची बहिण- सपना धननाईक असे दोघे दि. 17.04.2022 रोजी 18.15 वा. सु. तामलवाडी येथील सुतगिरणी समोरील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरुन स्कुटर क्र. एम.एच. 13 डीजे 2969 ने प्रवास करत होते. यावेळी अज्ञात मोटारसायकलने विजय यांच्या स्कुटरला पाठीमागून दिलेल्या धडकेत विजय यांसह त्यांची बहिण- सपना या गंभीर जखमी झाल्या. या अपघातानंतर अज्ञात मो.सा. चा आज्ञात चालक अपघात स्थळावरुन मो.सा. सह पसार झाला. अशा मजकुराच्या विजय साळुंके यांनी दि. 25 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं.कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत जकेकुर, ता. उमरगा येथील साहिल इकबाल शेख, वय 20 वर्षे हे दि. 22.04.2022 रोजी 19.30 वा. सु. उमरगा- जकेकुर असा प्रवास मोटारसायकल क्र. एम.एच. 13 बीएक्स 4147 ने करत होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने विना नोंदनी क्रमांकाचा जॉन डिअर ट्रॅक्टर हा चुकीच्या दिशेने निष्काळजीपने चालवल्याने साहिल शेख यांच्या मो.सा. ला समोरुन धडकला. या अपघातात साहिल यांच्या डाव्सा मांडीचे व पायाच्या बोटाचे हाड मोडून ते गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर नमूद ट्रॅक्टरचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या साहिल शेख यांनी दि. 25 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web