उस्मानाबाद जिल्ह्यात पाच अपघातात तीन ठार, पाच जखमी 

 
crime

उस्मानाबाद  : चालक- कुमा भागवत नेटके यांनी दि. 18.05.2022 रोजी 11.30 वा. सु. देशपांडे स्थानक, उस्मानाबाद येथील रस्त्यावर ऑटो रीक्षा क्र. एम.एच. 13 आर 9663 हा निष्काळजीपने चालवल्याने रस्त्याकडेला थांबलेले जनार्धन बाबुराव कांबळे, वय 82 वर्षे, रा. उस्मानाबाद यांना समोरुन धडकल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या बंडु जनार्धन कांबळे यांनी अनैसर्गीक मृत्यु क्र. 35 / 2022 फौजदारी प्रक्रीया संहिता कलम- 174 च्या चौकशी दरम्यान दि. 15 जून रोजी दिलेल्या जबाबावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत चिखली, ता. उस्मानाबाद येथील सोहम संजय चाफाकानडे, वय 19 वर्षे हा दि. 30.05.2022 रोजी 13.30 वा. सु. उस्मानाबाद येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोरील महामार्गाने मोटारसायकल चालवत जात होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने अज्ञात चारचाकी वाहन निष्काळजीपने चालवल्याने सोहम यांच्या मो.सा. ला पाठीमागून धडकले. या अपघातात सोहम यांच्या डोक्यास मार लागून उजव्या मांडीचे हाड मोडून ते गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर अज्ञात वाहनाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या संजय चाफाकानडे यांनी दि. 15 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : तुळजापूर येथील कैलास लक्ष्मण पवार, वय 45 वर्षे व  दत्ता वसंतराव जगताप, वय 50 वर्षे हे दोघे दि. 15 जून रोजी 13.00 वा. सु. तुळजापूर येथील महामार्गावर स्कुटर क्र. एम.एच. 25 एटी 7111 ने प्रवास करत होते. यावेळी अज्ञात चालकाने ट्रक क्र. जी.जे. 36 व्ही 4933 हा निष्काळजीपने चालवल्याने कैलास पवार चालवत असलेल्या नमूद स्कुटरला पाठीमागून धडकला. या अपघातात कैलास यांसह दत्ता हे गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद ट्रकचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या आप्पासाहेब शरद पवार, रा. तुळजापूर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304(अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : परंडा येथील सुनिल भारत वडतीले, वय 35 वर्षे हे दि. 12 जून रोजी 23.45 वा. सु. परंडा येथील सटवाई मंदीरासमोरील कुर्डुवाडी रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 जीटी 4039 ही चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने अज्ञात वाहन निष्काळजीपने चालवल्याने सुनिल वडतीले यांच्या मो.सा. ला पाठीमगून धडकल्याने सुनिल हे गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर अज्ञात वाहनाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या अनिल भारत वडतीले यांनी दि. 15 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : चालक- गुरुबसाप्पा शिवमुर्ती साधु, रा. एकलुर, ता. बसवकल्याण, जि. बिदर यांनी दि. 15 जून रोजी 00.30 वा. सु. चिवरी फाटाजवळील रस्त्यावर आराम बस क्र. ए. आर. 02-5359 ही निष्काळजीपने चालवल्याने ती अनियंत्रीत होउन रस्त्याखाली जाउन पलटली. या अपघातात श्रीशैल्यम विटन चन्ना, रा. बांडलागुडा, हैद्राबाद, राज्य- आंध्रप्रदेश व सुजाता चंद्रशेखर शर्मा, रा. कर्नुल, राज्य- आंध्रप्रदेश हे दोघे जखमी झाले. अशा मजकुराच्या श्रीशैल्यम चन्ना यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web