उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात तीन जखमी 

 
crime

नळदुर्ग  : अक्कलकोट रोड, सोलापूर येथील अर्चना गौरीशंकर लंगोटे या नातेवाईकांसह दि. 20.02.2022 रोजी 16.30 वा. सु. जळकोट शिवारातील रस्त्याने विस्टा कार क्र. एम.एच. 14 ईयु 0417 ने प्रवास करत होत्या. यावेळी अज्ञात चालकाने कार क्र. ए.पी. 07 सीयु 1079 ही निष्काळजीपने चालवल्याने अर्चना लंगोटे प्रवास करत असलेल्या नमूद कारला पाठीमागून धडकली. या अपघतात अर्चना यांचे दोत पडले तर त्यांची मुलगी- श्रावणी हीच्या हनुवटीस गंभीर मार लागला. या अपघातानंतर नमूद कारचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन कारसह पसार झाला. अशा मजकुराच्या अर्चना लंगोटे यांनी दि. 26.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम  : भिमनगर, मुरुम येथील महेश मच्छिंद्र लिमये, वय 53 वर्षे हे दि. 08.02.2022 रोजी 16.30 वा. सु. गावातील माधवराव पाटील महाविद्यालय समोरील रस्ता स्कुटर क्र. एम.एच. 25 एपी 7243 ही चालवत ओलांडत होते. यावेळी अज्ञात चालकाने कार क्र. एम.एच. 42 एचएफ 7072 ही निष्काळजीपने चालवल्याने महेश लिमये चालवत असलेल्या स्कुटरला धकडकल्याने ते किरकोळ जखमी झाले. या अपघातानंतर नमूद कारचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या महेश लिमये यांनी दि. 26.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337 सह मो.वा.का. कलम- 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


रहदारीस धोकादायकपने वाहन उभे करणाऱ्या 7 चालकांवर गुन्हे दाखल

मुरुम  : सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्या 7 चालकांवर मुरुम पोलीसांनी काल दि. 26.02.2022 रोजी कारवाया केल्या. यात विठ्ठल चौधरी, मुनीरपाशा शेख, भालचंद्र तडकले या तीघांनी मुरुम येथील सार्वजनिक रस्त्यावर आपापल्या ताब्यातील ऑटो रीक्षा रहदारीस धोकादायकरित्या उभा केला. तर पप्पु राठोड व सागर गायकवाड या दोघांनी मुरुममोड येथील सार्वजनिक रस्त्यावर आपापल्या ताब्यातील ऑटो रीक्षा रहदारीस धोकादायकरित्या उभा केला. तसेच शाहीद मासुलदार यांनी नाईकनगर, ता. उमरगा येथी सार्वजनिक रस्त्यावर तर मुजाफर शेख यांनी सुंदरवाडी फाटा येथील सार्वजनिक रस्त्यावर ऑटो रीक्षा रहदारीस धोकादायकरित्या उभा केला.  यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद 7 व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 283 अंतर्गत मुरुम पो.ठा. येथे स्वतंत्र 7 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web