उस्मानाबाद जिल्ह्यातील हाणामारीच्या तीन घटना 

 
crime

वाशी : इंदापूर, ता. वाशी येथील सरपंच- गणेश विजयकुमार गपाट यांना जुन्या वादाच्या व सरपंच पदाचा राजीनामा देण्याच्या कारणावरुन दि. 04.06.2022 रोजी 22.00 वा. सु. इंदापूर येथे गावकरी- पिंटु गपाट, पृथ्वीराज गपाट, अशोक गपाट, समाधान पाटील, प्रशांत गपाट, बालाजी मोरे, गणेश पाटील, रामराजे गपाट, शुभम गपाट, योगेश पखाले, विशाल कुंभार यांसह पाच अनोळखी पुरुष यांनी शिवीगाळ केली. तसेच ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी टामी, कत्ती व काठीने गणेश गपाट यांना मारहान करुन गंभीर जखमी केले. या दरम्यान गणेश गपाट यांनी आपल्या बचावासाठी जवळील पारडे यांच्या घरात शिरले असता नमूद लोकांनी पारडे यांच्या घाराच्या खिडक्या फोडून नुकसान केले. यावेळी गणेश यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या आई- वडीलांसही नमूद लोकांनी मारहान करुन गावकरी- निलेश चोपडे यांना त्यांच्या घरात घूसून मारहान करुन घरासमोरील कारच्या काचा फोडून नुकसान केले. अशा मजकुराच्या गणेश गपाट यांनी दि. दि. 05 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 326, 324, 452, 427, 143, 148, 149, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भूम  : ईराचीवाडी, ता. भूम येथील बापु चंद्रहार देवरे व मनोज देवरे या दोघा पिता- पुत्रांनी दि. 04 जून रोजी 21.30 वा. सु. गावातील ग्रामपंचायतजवळ भाऊबंद- भानुदास शंकर देवरे यांना शेतातील नळ जोडणीचे साहित्य घेतल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड फेकून मारुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या भानुदास देवरे यांनी दि. 05 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : तडवळा (क.), ता. उस्मानाबाद येथील तानाजी पवार, सुनिल पवार, शाहु पवार यांसह गोपाळवाडी पारधी पिढी येथील तानाजी काळे, बलभिम काळे, पोपट काळे, लाला काळे, ताईबाई काळे या सर्वांनी दि. 01 जून रोजी सटवाई पारधीपिडी, गोपाळवाडी येथे जाउन ग्रामस्थ- शांता किरण काळे यांसह त्यांच्या कुटूंबीयांस देवकार्यात झालेल्या वादाच्या कारणावरुन शिवीगाळ केली. तसेच दगड, काठी, शॉकअपसर यांनी मारहान करुन जखमी केले. या मारहानीमुळे शांता काळे या गर्भवती असल्याने त्यांचे 7 महिन्याचे स्त्री जातीचे अर्भक मृत अवस्थेत जन्माला आले. अशा मजकुराच्या शांता काळे यांनी दि. 05 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 316, 325, 323, 504, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web