उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या तीन घटना

शिराढोण : ताडगाव येथील एका शेत विहीरीतील गाळ उपसा दिनांक 12 एप्रील रोजी 08.30 वा केला जात होता. यावेळी गाळ वाहुन नेणा-या चालक – सलमान पठाण यांच्या ट्रॅक्टर-ट्रेलरचा धक्का गाळ उपसा करणा-या क्रेनच्या केबलला लागला. यातुन वाद उदभवुन क्रेन चालक- अक्षय जाधवर याने सलमान पठाण यांसह त्यांचा सहकारी शहाबाज डांगे यांना शिवीगाळ करुन लाकडी दांडयाने मारहाण केल्याने त्यांच्या डोक्यास दुखापत झाली. अशा मजकुराच्या सलमान यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 326, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बेंबळी : : राजुरी ग्रामस्थ रमेश मते हे दिनांक 10 एप्रील रोजी 13.00 वा चिखली येथील एका पेट्रोलीयम विक्री केंद्रासमोरील रस्त्यावर उभे होते. यावेळी सकनेवाडी ग्रामस्थ दयानंद व कुशानंद भोईटे या दोघा भांवासह अन्य दोघे अनोळखी तरुण कारने तेथे आले. यावेळी भोईटे बंधुंनी मते यांच्या आईच्या जमीनीचा ताबा मागण्याच्या वादातुन नमुद दोन सहकारी मित्रांच्या मदतीने मते यांना काठीने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रमेश मते यांनी दि. 12 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 324, 506,34 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बेंबळी : राजुरी ग्रामस्थ रमेश मते हे दिनांक 10 एप्रील रोजी 13.00 वा चिखली येथील एका पेट्रोलीयम विक्री केंद्रासमोरील रस्त्यावर उभे होते. यावेळी सकनेवाडी ग्रामस्थ दयानंद व कुशानंद भोईटे या दोघा भांवासह अन्य दोघे अनोळखी तरुण कारने तेथे आले. यावेळी भोईटे बंधुंनी मते यांच्या आईच्या जमीनीचा ताबा मागण्याच्या वादातुन नमुद दोन सहकारी मित्रांच्या मदतीने मते यांना काठीने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रमेश मते यांनी दि. 12 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 324, 506,34 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.