उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या तीन घटना 

 
crime

परंडा : सरनवाडी येथील प्रदिप जाधव यांचा मुलगा दि. 13 मार्च रोजी 10 वाजता घराबाहेर खेळत असताना गल्लीतील आनंद जाधव यांच्या मोटार सायकलची त्यास धडक लागली. याचा जाब प्रदिप यांनी आनंद यास विचारला असता आनंद यांनी प्रदिप यांना शिवीगाळ करुन वीट फेकुन मारल्याने ते जखमी झाले.अशा मजकुराच्या प्रदिप जाधव यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 279, 337,324,504,506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 परंडा  : खानापुर येथील शेतकरी हणुमंत वीटकर हे  दि. 13 मार्च रोजी 08.30 वाजता शेतातील पिकास पाणी देत असताना गा्रमस्थ अशोक व सचिन गटकुळ यांनी न्यायालयीन खटल्याच्या वादातुन हणूमंत यांना शिवीगाळ करुन लाथा-बुक्यांनी, काठीने  मारहाण करुन ठार मारण्याची व पुन्हा या शेतात न येण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या हणुमंत यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 324,504,506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा  : सास्तुर येथील व्यंकट सुरवसे यांनी दि. 12 मार्च रोजी  20.00 वाजता कौटुंबीक वादातुन आपला मुलगा- गणपत याच्या उजव्या पायाच्या नडगीवर लोखंडी गज मारल्याने गणपत हे गंभीर जखमी झाले.अशा मजकुराच्या गणपत यांनी वैदयकिय उपचारादरम्याण दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं.326 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

                                                                                               

From around the web