उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या तीन घटना
मुरुम : आलुर, ता. उमरगा येथील ओमशेट्टे कुटूंबातील बसवराज, काडाप्पा, अभिशेख, सागर, पवन यांच्या गटाचा गावातील मरबे कुटूंबातील आनंद, रेवणसिध्द, भिमाशंकर, कांताबाई, सारीका यांसह श्रीदेवी देशेट्टे यांच्या गटाशी दि. 12.02.2022 रोजी 08.00 व 20.00 वा. सु. गावातील छ. शिवाजी महाराज चौकात जुन्या वादावरुन हानामाऱ्या झाल्या. यात दोन्ही गटांतील सदस्यांनी परस्परविरोधी गटांतील सदस्यांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. तसेच ओमशेट्टे यांच्या गटातील सदस्यांनी मरबे यांच्या वाहनाची काच फोडून आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या आनंद मरबे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 326, 427, 504, 506 तर शंकर ओमशेट्टे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : मानमोडी तांडा, ता. तुळजापूर येथील बंडु बाबु राठोड यांनी जुन्या वादावरुन दि. 12.02.2022 रोजी 02.30 वा. सु. तांडा परिसरात ग्रामस्थ- दिनेश माणिक राठोड यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान केली तसेच उजव्या हातास व डाव्या मांडीस चाव घेउन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या दिनेश राठोड यांनी दि. 13.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : मुन्सी प्लॉट, उमरगा येथील सलीम ईकबाल बागवान यांनी दि. 13.02.2022 रोजी 20.30 वा. सु. राहत्या परिसरात गल्लीतीलच- सय्यद सादीक करीमसाब यांना मद्य पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ब्लेडने सय्यद यांच्या मानेवर वार करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सय्यद यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.