उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या तीन घटना 

 
Osmanabad police

भूम  : सावरगाव, ता. भूम येथील बापु अभिमान यादव हे दि. 12.02.2022 रोजी 17.00 वा. सु. गावातील आपल्या गॅरेज दुकानासमोर थांबले होते. यावेळी अंतरवली, ता. भूम येथील विष्णु नाईकवाडी, पंढरीनाथ नाईकनवरे, वैभव नाईकनवरे, शोभा नाईकनवरे या सर्वांनी दहा वर्षे पुर्वीचा आर्थिक व्यवहार उकरुन काढून बापु यादव यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बापु यादव यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा  : दशमेगाव, ता. वाशी येथील ईश्वर अरुण शिंदे, हारणाबाई शिंदे, आरुण शिंदे या तीघांनी जुन्या वादाच्या कारणावरुन दि. 08.02.2022 रोजी 17.00 वा. सु. बोरगाव फाटा येथील सुरेश रामदास शिंदे यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच ईश्वर शिंदे यांनी सुरेश यांच्या काखेजवळ चावा घेउन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या सुरेश शिंदे यांनी दि. 12.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा  : लोहारा (बु.), ता. लोहारा येथील महादेव विजय गोरे, वय 31 वर्षे हे दि. 12.02.2022 रोजी 10.00 वा. सु. लोहारा येथील रस्त्याने मोटारसायकल चालवत जात होते. यावेळी त्यांच्या मोसाला ग्रामस्थ- प्रतिक दत्ता रसाळ, वय 22 वर्षे यांच्या वाहनाचा धक्का लागल्याने गोरे यांनी त्यांना जाब विचारला. यावर रसाळ यांनी चिडून जाउन गोरे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन दगड फेकून मारुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या महादेव गोरे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                               

From around the web