उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या तीन घटना 

 
Osmanabad police

परंडा  : खासापुरी, ता. परंडा येथील सुरेखा आनंद शिंदे, वय 40 वर्षे या त्यांच्या पतीसह दि. 30.01.2022 रोजी 10.00 वा. सु. आपल्या घरात होत्या. यावेळी परंडा येथील अल्ताफ सत्तार पठाण यांसह एक अनोळखी पुरुषाने शिंदे यांच्या घरात येउन आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन सुरेखा शिंदे यांसह त्यांचे पती- आनंद यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी त्या शिंदे पती- पत्नीच्या बचावास त्यांची दोन मुले आली असता त्यांसही त्या दोघांनी ढकलून दिले. अशा मजकुराच्या सुरेखा शिंदे यांनी दि. 11.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भूम : चिंचोली, ता. भूम येथील रणजित विक्रम शिर्के (माळी) यांचे गावात दुध व्यवसायाचे दुकान असून दि. 23.01.2022 रोजी 10.00 वा. सु. आपल्या दुकानात होते. यावेळी गावकरी- औदुंबर वारे, अजिनाथ साळुंके, रमेश साळुंके, सोमा वारे, रमेश वारे, गौतम वारे, सुग्रीव वारे, रणजित साळुंके, सोमनाथ चौधरी या सार्वांनी दुकानात शिरुन दुकानाच्या कारणावरुन रणजित शिर्के यांना शिवीगाळ करुन दुकानातून बाहेर काढून धक्काबुक्की केली. तसेच दुकानास कुलूप लाउन ते उघडण्याचा प्रयत्न केल्यास ठार मारण्याची धमकी त्यांना दिली. अशा मजकुराच्या रणजित शिर्के यांनी दि. 11.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 323, 327, 427, 442, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : नळदुर्ग, ता. तुळजापूर येथील गंगाबाई देविदास जाधव या दि. 10.02.2022 रोजी 11.00 वा. सु. अलियाबाद गट क्र. 15 मधील आपल्या शेतात होत्या. यावेळी नातेवाईक- मोहन निवृत्ती जाधव, बळी धोंडीबा जाधव, मनोज मच्छिंद्र जाधव या तीघांनी तेथे जाउन, “तु वऱ्हाडे यांच्याकडून शेत विकत का घेतले. व न्यायालयात मोजणीचा दावा का टाकला.” असे गंगाबाई यांना धमकावून शेतातील पत्रा शेड पाडून आर्थिक नुकसान केले. यावेळी गंगाबाई यांनी त्यांना अडवले असता त्या तीघांनी गंगाबाई यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान केल्याने गंगाबाई यांचा उजवा खांदा निखळला आहे. अशा मजकुराच्या गंगाबाई जाधव यांनी दि. 11.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web