उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या तीन घटना 

 
Osmanabad police

भूम  : चिंचोली, ता. भुम येथील केशरबाई औदुंबर वारे, वय 47 वर्षे या कुटूंबीयांसह दि. 04.02.2022 रोजी 23.00 वा. सु. आपल्या घरात होत्या. यावेळी नातेवाईक- भास्कर वारे, महादेव वारे, तात्यासाहेब वारे, लिंबराज वारे यांसह गावातील विक्रम शिर्के, रणजीत शिर्के या सार्वांनी केशरबाई यांच्या घरात घुसून पुर्वीच्या वादावरून केशरबाई यांसह त्यांच्या पतीस शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच घरातील 20,000 ₹ रकमेसह केशरबाई यांच्या गळ्यातील सुवर्णदागिने हिसकावून नेले. अशा मजकुराच्या केशरबाई वारे यांनी दि. 09 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 327, 452, 504, 506, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा  : सापनाई, ता. कळंब येथील अशोक सुरवसे यांसह त्यांचा भाचा यांनी पुर्वीच्या वादावरून दि. 25.12.2021 रोजी 16.15 वा.सु. शिंगोली- बरमाचीवाडी रस्त्यावर गौर, ता. कळंब ग्रामस्थ- संजय शिवाजी कांबळे यांना शिवीगाळ करुन काठीने मारहान केल्याने कांबळे यांच्या उजव्या हाताचे हाड मोडुन ते गंभीर जखमी झाले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संजय कांबळे यांनी दि. 09.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 323, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  : सरमकुंडी, ता. वाशी येथील काकासाहेब सखाराम हाके, वय 40 वर्षे हे दि. 19.01.2022 रोजी 15.30 वा. सु. सरमकुंडी येथील सह्याद्री हॉटेलसमोर होते. यावेळी काकासाहेब यांनी हनुमंत दादा हाके यांना आपले ऊस पिक न तोडल्याचा जाब विचारला असता हनुमंत यांसह, दादा हाके, आशा हाके अशा तीघांनी काकासाहेब यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन त्यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले. अशा मजकुराच्या काकासाहेब हाके यांनी 09.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 324, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                               

From around the web