उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना 

 
crime

उमरगा  : साईधाम कॉलनी, उमरगा येथील- शिवाजी कामू राठोड  यांच्या बंद घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि.31.12.2022 रोजी 18.00 ते दि.01.01.2023 रोजी 17.00 वा.चे सुमारास तोडुन आतील गोदरेजच्या कपाटामधील अंदाजे 75,000 ₹ किंमतीचे सुमारे 30 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने असा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या शिवाजी राठोड  यांनी दि. 02.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : कसगी, उमरगा येथील-चंचलपुरी गोविंदपुरी गोसावी,वय 80 वर्षे हे दि.02.01.2023 रोजी 12.10 वा.सु.उमरगा बसस्थानक येथे नांदेड गुलबर्गा बस मध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेउन गोसावी यांच्या विजारीच्या खिशातील अंदाजे 10,000 ₹ किंमतीची रियलमी नारझो कंपनीचा मोबाईल त्यांच्या नकळत चोरुन नेला. अशा मजकुराच्या चंचलपुरी गोसावी यांनी दि.02.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमळा  : दहिफळ,ता.कळंब येथील- हनुमंत रामभाउ गपाट यांची अंदाजे 48,000 ₹ किंमतीची होडां शाईन मोटारसायकल क्र.एम.एच.25 एटी  2153 ही दि.28.12.2022 रोजी 21.00 ते दि.29.12.2022 06.00 वा. दरम्यान गपाट यांच्या घरासमोरून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या हनुमंत गपाट यांनी दि.02.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web