उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना 

 
crime

उस्मानाबाद  :जहागीरदारवाडी,ता.उस्मानाबाद येथील-उमाकांत धोडींराम पवार यांचे  जहागीरदारवाडी शिवारातील गट नं. 130 येथील शेता मध्ये ठेवलेले अंदाजे 15,000 ₹ किंमतीचे बोअरवेलचे 200 फुट केबल व स्टार्टर ठेवायचा बोर्ड हे दि.14.11.2022 रोजी 16.00 वा ते दि.02.12.2022 रोजी 12.00 वा दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या उमाकांत पवार  यांनी दि.29.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा  : उंबरा, ता.कळंब येथील- रणजितसिंह बाळकृष्ण्‍ देसाई यांचे उंबरा येथील  विंड मास्टचे अंदाजे 2,00,000 ₹ किंमतीची 20 गायरोप व त्याची ॲक्सेसरीज असे दि.20.12.2022 रोजी 23.30 ते दि. 21.12.2022 रोजी 06.00 वा.दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. तर विंड मास्टचे इंन्सेट,डाटालींगर,टॉवर स्ट्रक्चर यांचे नुकसान केले.अशा मजकुराच्या रणजितसिंह देसाई यांनी दि.29.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379,427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापुर  : वधेमनेरी, ता.आरवी, जि.वर्धा येथील- अर्चना मनोहर वाघ, वय 33 वर्ष या दि.29.12.2022 रोजी 11.00 ते 11.15 वा.दरम्यान तुळजापुर येथील श्री तुळजाभवानी मंदीर दर्शनास गेल्या होत्या दरम्याण दोन अनोळखी स्रीयांनी अर्चना यास चाकूचा धाक दाखवून  त्यांच्या पर्स मधील मोबाईल फोन,आधारकार्ड,तर भाविक गायत्री बीगवनकर रा.चिंचवड यांचाही मोबाईल फोन व 4,000 ₹ रोख रक्कम असा दोघीचां एकुण 29,000 ₹ चा माल लुटून पसार झाल्या.अशा मजकुराच्या अर्चना वाघ यांनी दि.29.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web