उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना 

 
crime

कळंब  : साइनगरी, कळंब येथील सचिन एरंडे यांच्या बंद घरासह लोखंडी दरवाजाचा  कडी कोयंडा दिनांक- 7-8 मार्च दरम्यान अज्ञात व्यक्तीने तोडुन कपाटातील 25,000 रुपये रक्कम चोरुन नेली. यावरुन  भा.दं.सं. कलम- 457,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे

ढोकी : तेरणा तलावाच्या सार्वजनिक पाणी पुरवठा विहीर ते विदयुत रोहीत्रापर्यंतची  प्रत्येकी 9.5 मी मी  जाडीच्या 4 तारांची 42 मीटर केबल अज्ञात व्यक्तीने 10 मार्च रोजी सकाळी चोरुन नेली. यावरुन  सुरक्षा रक्षक शिवाजी साळुंके यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा:  उपळाई येथील कुलदिप सुतार यांची इंडिका कार क्रमांक एम.एच.23 ए.डी 2402 ही त्यांचा गावकरी मित्र बाळु मुंडे यांने दि.27/02/2022 रोजी दोन तास वापरण्यास नेली होती. परंतु मुंडे यांनी ती कार सुतार यांना अदयाप परत न करता सुतार यांची फसवणुक केली आहे.  अशा मजकुराच्या सुतार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 406 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे

From around the web