उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना 

 
Osmanabad police

शिराढोण  : जायफळ, ता. कळंब येथील विलास जालींदर वडगावकर यांच्या घराचे कुलूप दि. 15- 16.02.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने तोडून घरातील 72 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 10,000 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या विलास वडगावकर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : सांजावेस गल्ली, उस्मानाबाद येथील वाजीद गुलाम सौदागर यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 डब्ल्यु 3876 ही दि. 14.02.2022 रोजी 10.00 ते 14.00 वा. सु. घाटंग्री आश्रम शाळेसमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या वाजीद सौदागर यांनी दि. 16 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : हिंगनगाव (बु.), ता. परंडा येथील सागर अंगद लोखंडे यांची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल क्र. एम.एच. 09 इआर 7216 ही उस्मानाबाद येथील जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरुन दि. 15.02.2022 रोजी 14.30 ते 15.30 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सागर लोखंडे यांनी दि. 16 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपहरण 

मुरुम  : “साप्ताहीक बाजारातून भाजीपाला घेउन येते.” असे कुटूंबीयास सांगुण दि. 11.02.2022 रोजी 10.00 वा. सु. एक 13 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) घराबाहेर पडली. ती लवकर घरी न परतल्याने कुटूंबीयांनी तीचा बाजार परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळुन आली नाही. यावरुन अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले असावे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या आजीने दि. 16 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web