रहदारीस धोकादायकपने वाहन उभे करणाऱ्या तीन चालकांवर गुन्हे दाखल

 
crime

लोहारा  : सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्या तीन चालकांवर लोहारा पोलीसांनी काल दि. 26.03.2022 रोजी कारवाया केल्या. यात जठीबा धोंडीबा घोडके यांनी त्यांची ॲपे रिक्षा क्रमांक एम एच 25 एम 0160 ही जेवळी गावातील वेसजवळ सार्वजनिक रस्त्यावर तर अशोक मारुती आदटराव यांनी लोहारा बस स्थानक समोर त्यांचे वाहन पिकअप क्रमांक एम एच 13 बी एन 3628  तर विकास संदीपान गोरे यांनी त्यांचे वाहन पिकअप क्रमांक एम एच 12 एच एल 8015 हे  ही लोहारा बस स्थानक समोर सार्वजनिक रस्त्यावर  रहदारीस धोकादायकरित्या उभे केले.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीन व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 283 अंतर्गत लोहारा पो.ठा. येथे स्वतंत्र तीन गुन्हे नोंदवले.

अपघात 

उमरगा  : उमरगा येथील इक्बाल खालीदमियाँ  हे दिनांक 15 मार्च रोजी 12.00 वा मोटार सायकल क्रमांक एम एच 25 ए एफ 9204 चालवत जात होते. यावेळी निष्काळजीपणामुळे त्यांची मोटार सायकल समोरील मोटार सायकलला पाठीमागुन धडकली.या अपघातात ईक्बाल यांच्या मोटार सायकलवर पाठीमागे बसलेला साजीद ईसाक शेख हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या ईसाक शेख यांनी  दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 279, 338  व मोवाका 184 अंतर्गत्‍ गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   

From around the web