उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे
भूम : पाथरुड, ता. भुम येथील- प्रज्ञा उमेश दुरुंदे, वय 30 वर्षे या दि. 17.12.2022 रोजी ते दि. 18.12.2022 रोजी दरम्यान औरंगाबाद ते पाथरुड असा बसने प्रवास करत होत्या. प्रवासा दरम्यान प्रज्ञा यांच्या पिशवीतील सुवर्ण व चांदीचे दागिने यात गंठन, मुदी, बदाम व चैन असे एकुण अंदाजे 1,55,000 ₹ किंमतीचे 2 तोळे 27 ग्रॅम वजनाचे दागिने प्रज्ञा यांच्या नकळत अज्ञात व्यक्तीने चोरले. अशा मजकुराच्या प्रज्ञा दुरुंदे यांनी दि. 21.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : गणेशनगर, उमरगा येथील- गणेश माणिकराव निर्मळे यांची अंदाजे 20,000 ₹ किंमतीची होंडा सीबी शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएम 6915 ही दि. 15.12.2022 रोजी 11.00 ते दि. 16.12.2022 रोजी 06.00 वा. दरम्यान निर्मळे यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या गणेश निर्मळे यांनी दि. 21.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : आरळी (बु.), ता. तुळजापूर येथील- बाबुराव नरसिंग उळेकर यांची अंदाजे 27,000 ₹ किंमतीची हिरो पॅशन प्रो. मोटारसायकल क्र. एम.एच. 25 झेड 8451 ही दि. 15.12.2022 रोजी 23.30 ते दि. 16.12.2022 रोजी 06.00 वा. दरम्यान उळेकर यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या बाबुराव उळेकर यांनी दि. 21.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.