उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे 

 
crime

तुळजापूर  : हडको, तुळजापूर येथील- बालीका रामचंद्र इंगळे यांच्या बंद घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 17.11.2022 रोजी 11.00 ते 20.00 वा. दरम्यान तोडून आत प्रवेश करुन घरातील कपाटात असलेले 66,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या बालीका इंगळे यांनी दि. 18.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  : ज्योतीबाचीवाडी, ता. भुम येथील- भीमा आम्रता भगत यांचा अंदाजे 2,00,000 ₹ किंमतीचा महिंद्रा बोलेरो पिकअप क्र. एम.एच. 25 पी 3206 हा दि. 17.11.2022 रोजी 22.00 ते दि. 18.11.2022 रोजी 06.00 वा. दरम्यान त्यांच्या राहत्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या भीमा भगत यांनी दि. 18.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा  : कार्ला, ता. तुळजापूर येथील- बबन संजय जाधव यांचा ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एई 8595 हा दि. 18.11.2022 रोजी 08.00 वा. सु. लोकमंगल साखर कारखाना परिसरात उभा असताना त्या ट्रॅक्टरमधील अंदाजे 10,000 ₹ किंमतीचा सोनी कंपनीचा ॲम्प्लीफायर अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या बबन जाधव यांनी दि. 18.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 

From around the web