उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

उस्मानाबाद  : सिध्देश्वर वडगाव, ता. उस्मानाबाद येथील- बळीराम बबन मापारी यांची अंदाजे 30,000 ₹ किंमतीची मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एफएल 4778 ही दि. 21.01.2023 रोजी 22.30 वा. दरम्यान गावातील सिध्देश्वर मंदीरा समोरून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या बळीराम मापारी यांनी दि. 23.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भूम  : हाडोंग्री, ता. भुम येथील- संजय पोपट वाघमारे यांची अंदाजे 20,000 ₹ किंमतीची बजाज प्लॅाटिना मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एए 2254 ही दि. 19.01.2023 रोजी 12.00 ते 12.30 वा. दरम्यान मारोती मंदीरा कमानीचे जवळून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या संजय वाघमारे यांनी दि. 23.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
वाशी  : श्रीकांत विक्रम जगदाळे रा. वाशी यांच्या सरमकुंडी फाटा येथील न्यु यशोदा हॉटेलच्या काउंटर मधील रोख रक्कम अंदाजे 2,50,000 ₹ ही दि.17-18.01.2023 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरून नेला. अशा मजकुराच्या श्रीकांत जगदाळे यांनी दि. 23.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 381 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web