उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

अंबी  : अंबी, ता. भुम येथील अंबिका मंदीराचे बाहेर ठेवलेली दानपेटीचे कुलूप  दि.16.01.2023 रोजी 21.00 ते दि 17.01.2023 रोजी 04.30 वा.दरम्यान.अज्ञात व्यक्तीने तोडून त्यामधील अंदाजे 22,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली.अशा मजकुराच्या पुजारी- लिंबादास संभाजी गुरव यांनी दि.17.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : मस्सा (खं) ता. कळंब येथील- गणपत दादाराव थोरात यांच्या मस्सा (खं) शिवारातील गट नं.774 मधील शेतातील सोलरला बसवलेले स्टार्टर अंदाजे 15,000 ₹ किंमतीचे दि.02.01.2023 रोजी 16.00 ते दि.03.01.2023 रोजी 10.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या गणपत थोरात यांनी दि. 17.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : तेर,ता.उस्मानाबाद येथील- बाबासाहेब पंढरी राऊत हे दि.06.01.2023 रोजी 11.00 ते 17.00 वा.सु.नळदुर्ग येथील खंडोबा यात्रेत गेले असता अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेउन बाबासाहेब यांच्या गळ्यातील अंदाजे 1,30,000 ₹ किंमतीची 50 ग्रॉम वजनाची सोन्याची चैन चोरुन नेली. अशा मजकुराच्या बाबासाहेब राऊत यांनी दि. 17.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web